वृद्धापकाळ सुकर करण्यासाठी लक्षात ठेवा…….

मृत्यू येत नाही तोवर आपल्या मुला-बाळांसोबत एकाच छताखाली राहण्याची संस्कृती फक्त भारतातच मोठ्या प्रमाणावर जोपासली जाते. इतर अनेक देशात मुल मोठं झालं की आपल्या आई-वडिलांपासून लांब राहू लागतं. मात्र, आई-वडीलांपासून लांब राहणारी ही मुलं गरज पडेल तेव्हा त्यांच्या मदतीलाही धावून जातात.
भारतातही आता एकीकडे अशा प्रकारच्या विभक्त कुटुंब पद्धतीला प्राधान्य दिलं जातं. मात्र, यासोबतच भारतातील वृद्धांच्या समस्याही वाढत असल्याचं लक्षात येतं. नोकरी-धंद्याच्या निमित्ताने आई-वडिलांपासून लांब असणारे त्यांची जबाबदारीही नाकारताना दिसतात. अर्थात, याला अनेक अपवाद लागू होतात. पण, मुलांशी कटुता घेण्यापेक्षा वृद्धापकाळ जवळ आलेल्यांनी काही योजना आखून आधीच आपली सोय करून ठेवली, तर त्यांची मुलं मनाने त्यांच्याजवळ राहतील आणि त्यांचं म्हातारपण आनंदात जाईल. पाहूया, वृद्धापकाळ सुकर करण्याच्या काही टिप्स…

मुलांच्या जवळपास रहावं, पण वेगळा संसार थाटावा.

म्हातारपणात कधीही आरोग्याची समस्या उद्भवू शकते. अशात मुलं जवळ असल्याने आई-वडीलांना आधार वाटतो. मात्र, याच काळात मुलांना आई-वडिलांचं ओझं वाटू नये, यासाठी मुलांच्या घरापासून जवळच्या अंतरावर दुसऱ्या घरात रहावं.

प्रत्येकवेळी भेटायला येण्याची अपेक्षा नको

स्पर्धेच्या जगात मुलं फार व्यस्त असतात. अशावेळी आजारी पडल्यावर प्रत्येकवेळी मुलाने किंवा मुलीने भेटायला यावं, ही अपेक्षा करणं रास्त नाही.

स्वास्थ संभाळणं मोठी जबाबदारी

म्हातारपणात शरीराचं स्वास्थ संभाळणं ही त्या त्या व्यक्तीची जबाबदारी असते. वैद्यकीय तंत्रज्ञानाचा कमीत कमी वापर करून शरीर आतून निरोगी रहावं, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी नियमित व्यायाम, योगासने, पौष्टीक जेवण महत्वाचं असतं.

सामाजिक आयुष्य जोपासा

वृद्धापकाळात फार दगदग सहन होत नाही ही गोष्ट खरी आहे. मात्र, जमेल तसं सामाजिक किंवा इतर कामांत स्वतःला गुंतवून घेतल्याने नको त्या गोष्टींमध्ये लक्ष जात नाही. म्हातारपणाचा काळही कंटाळवाणा वाटत नाही.

बचत महत्वाची

तारुण्यात आई-वडिलांचं सगळं जीवन त्यांच्या मुलांभोवती फिरत असतं. आई-वडील मुलांच्या गरजा भागवण्यासाठी, शिक्षणासाठी सगळे पैसे खर्च करतात. पण, म्हातारपणाची सोय तारुण्यापासूनच केली पाहिजे. मुलं लहान असल्यापासूनच वृद्धापकाळासाठी पैशाची बचत सुरू करावी.

साठवण्यापेक्षा देण्यावर भर द्यावा

वय वाढल्यावर गोष्टी साठवून ठेवण्यापेक्षा वाटून टाकण्यावर भर द्यावा. गरजेचं असेल तेवढंच आणि तितकंच स्वतःजवळ ठेवावं.

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn

Search

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

1 thought on “वृद्धापकाळ सुकर करण्यासाठी लक्षात ठेवा…….”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Manohar Deshpande

Vibha Corporation

 

He has over 50 years of experience in industry and currently running his own  company by name “Vibha Corporation” in Nashik!He is founder President of an NGO by name “Sujan Nagrik Manch”which distributed 30500 meals to the needy in the recent lock-down!He is  associated as a Trustee with another NGO “Niradhar  Swavalamban Samiti”which runs a school for poor children in slum area in Nashik!He is past president of a Senior citizens association in Mahatmanagar,Nashik! He is involved in other social activities too!He has an in-depth knowledge about the challenges and aspirations of seniors in Nashik.